अंधार बोलतो

अंधार बोलतो
अंधार बोलतो
तेव्हा सांगतो
माणूस डोळे मिटून करतो
त्या विचारांच्या गोष्टी अंधार बोलतो वाचन सुरू ठेवा

विहीर

बर्‍याच वैयक्तिक म्हणाव्या अशा संदर्भांनी ही कविता नटलेली (फार साहित्यिक! निव्वळ वैयक्तिक संदर्भ आहेत इतकंच म्हणायचंय खरंतर.) असल्याने ब्लॉगवर टाकावी का? टाकलीच तर वाचकांपर्यंत (if any, not many!) कितपत पोचेल असंही एक वाटून गेलं. नाहीतरी अवघड किंवा ऍब्स्ट्रॅक्ट लिहीणारा म्हणून मी बदनाम आहेच… शेवटी ब्लॉगही माझाच आणि कविताही माझीच असा विचार करून (हा विचारही माझाच.) मी ही कविता आता इथे पोस्टतोय. नाव दिलंय विहीर.

वि.सू.: ह्यातील विहीर आणि अंधाराचं संदर्भ माझ्या एकटेपणापेक्षा नुकत्याच पाहिलेल्या डार्क नाईटशी जाऊन मिळतंय का याबद्दल माझ्याही मनात अजूनही संदेह आहे. असो.

विहीर वाचन सुरू ठेवा

एक अंधारा खड्डा

दुरून उजेडाचं मुख वाटणार्‍या प्रचंड अंधार्‍या खड्ड्यात कधी पडलो कळलंच नाही. दाणकन्‌ आपटलो, उजव्या भुवईवर जखम झाली. एक प्रत्यक्ष आणि हवं असणारं, असे दोन भाग दिसायला लागले तेव्हापासून. एक अंधारा खड्डा वाचन सुरू ठेवा

Personal Paradigm Shift- पर्सनल पॅराडाईम शिफ्ट

धनन धनन धन एकसारखा गुंजणारा आवाज. जड झालेले श्वास. अनियमित. डोक्यात अपयशाचं भय. डोक्यात ड्रम बडवल्यासारखं. मुंबईत असह्य उकडू लागलंय परत. दूर रस्त्यावरून वेगाने जाणार्‍या वाहनांची भिती वाटते. पलंगावर पडल्या पडल्या भिनतो तो वेग रक्तात. आणि मग अशक्य होतं झोपणं. फुल स्पीडवर फिरणार्‍या फॅनखालीही कपाळावर घाम साचू लागतो. घाबरून डोळे बंद करावे तरी जाणवते ती फक्त आग. कसलातरी personal paradigm shift करायची. धनन धनन धन र्‍हिदम वाढत राहतो. आणि बंद डोळ्यात आग. Personal Paradigm Shift- पर्सनल पॅराडाईम शिफ्ट वाचन सुरू ठेवा

शरीरांच्या कविता- बल्ब

बल्ब

निळा झीरोचा बल्ब
रात्रभर अंधार रंगवत होता.
आणि दोन शरीरं
त्यांच्या त्यांच्या एकटेपणाला. शरीरांच्या कविता- बल्ब वाचन सुरू ठेवा

पांढराभक्क उजेड काळाढुस्स अंधार

साधारण दोन महिन्यांपूर्वीच मी लिहिलं होतं, दोन ओळींतच अडून राहिल्याबद्दल. ह्या गेल्या दोन महिन्यात खूप काही घडलं, घडता घडता राह्यलं, कधी भिती वाटली, कधी एकटेपणा वाटला, प्रचंड आनंदही झाला. पण त्या दोन ओळींमध्ये अजूनही अडकलो होतो. काल रात्री साडेबारा-पावणेबाराच्या दरम्यान काहीतरी झालं. कविता लिहिली. यमकं वगैरे काही नाही. फक्त एकाखाली एक ओळी. मुक्तछंद म्हणा हवंतर…
जो काही कोलाज लिहिला गेला तो असा…
पांढराभक्क उजेड
बाहेर काळाढुस्स अंधार
गरगरणारा पंखा
किरकिरणारे रातकिडे
दूर कुठेतरी वाजणारा भोंगा
भुंकणारी कुत्री
’जागते रहो’
वॉचमनचा प्रेमळ सल्ला
इथेच कुठेतरी सभोवताली
एकटा मी.
मांज्यात पंख अडकून
भेलकांडत खाली आलेलं ते कबूतर
कुठल्या नजरेनं बघितलं असेल त्यानं पतंगाकडे
तुटलेल्या पंखाची जखम हुळहुळताना
त्या रात्री कुत्रीही जरा शांत होती;
म्हणे अमावस्या होती.
बाहेर काळाढुस्स अंधार
सिगारेटचं जळतं टोक सुद्धा सूर्य वाटतं.
नव्हे; ती होती चिलीम, अफूची
कबूतरांवर पसा पसाभर धान्य फेकणार्‍याकडे
आशाळभूतपणे बघणार्‍या थोट्या भिकार्‍याची
रातकिडे किरकिरतायत अजूनही
मी ही असाच, इथेच,
अडकलेला
स्वाभिमानी
रांगेतल्या पुढच्यांची हांजी हांजी करत
पुढे जाणार्‍या तद्दन भिकार्‍यांविरुद्ध
वॉचमनचा प्रेमळ सल्ला
’जागते रहो’

साधारण दोन महिन्यांपूर्वीच मी लिहिलं होतं, दोन ओळींतच अडून राहिल्याबद्दल. ह्या गेल्या दोन महिन्यात खूप काही घडलं, घडता घडता राह्यलं, कधी भिती वाटली, कधी एकटेपणा वाटला, प्रचंड आनंदही झाला. पण त्या दोन ओळींमध्ये अजूनही अडकलो होतो. काल रात्री साडेबारा-पावणेबाराच्या दरम्यान काहीतरी झालं. कविता लिहिली. यमकं वगैरे काही नाही. फक्त एकाखाली एक ओळी. मुक्तछंद म्हणा हवंतर… पांढराभक्क उजेड काळाढुस्स अंधार वाचन सुरू ठेवा

फक्त दोन ओळी…

पांढराभक्क उजेड
बाहेर काळाढुस्स अंधार

परवापासून फक्त ह्याच आणि एवढ्याच ओळी सुचल्यात. ह्यापुढे लिहायला ओळीच सुचत नाहीयेत. आणि ओळी सुचायला कसलीच कल्पनाही डोळ्यासमोर येत नाहीये. Absolutely nothing. फक्त दोन ओळी… वाचन सुरू ठेवा