दळण

दळण तेच दळत रहातं
जातं फक्त बदलत रहातं
कधी जाणूनबुजून
कधी सहज आपोआप
कधी दुःखाच्या आवेगात
कधी सुखाच्या सृजनात

दळणात
जात्यात टाकल्याटाकल्या लगेच
चिरडून कुणीच निघत नाही
पण जातंच ते… न चिरडून निघता येईल का?

“प्यार व्यार सब अपनी जगह ठिक है
दुख होता है जब लोग बदल जाते है”

दळणही तेच
हव्याहव्याशा असणार्‍या नातेसंबंधांचं
जातं बदलत रहातं
बदलणार्‍या माणसांसह
आणि,
चिरडल्या जातात,
सो कॉल्ड
जालिम जमान्याच्या कुरबुरीत
दोन जगणं जवळपास येतानाच्या
साहजिक संघर्षात
भुसकट होऊन पडतात,
भावना


नाही नाही…
गोष्ट इथेच संपत नाही
सुरू रहाते

आणि परत चक्र
ओळख, मैत्री
आवड…
वगैरे वगैरे

ह्या सगळ्या पायर्‍यांवर
तुम्ही आम्ही गळून पडतो
किंवा वगळून पडतो
खड्यासारखे…

गव्हा तांदळाला
वेगळी जाती असणं
ठिक

पण म्हणून माणसांनाही?

किती उड्या मारत रहाणार?
न चिरडण्यार्‍या जात्यासाठी
एकावरून तिसर्‍यावर
तिसर्‍यावरून दुसर्‍यावर

माणूस आणि गव्हा तांदळात
फरक आहेच की…

 

११:५५ सकाळ
०७ जाने ११

यावर आपले मत नोंदवा